त्यामुळे शेतक-यांनी थांबवलं उद्धव ठाकरेंचं भाषण !

त्यामुळे शेतक-यांनी थांबवलं उद्धव ठाकरेंचं भाषण !

पंढरपूर – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंढरपूरमध्ये महासभा घेतली. या सभेदरम्यान भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या सभेसाठी शिवसैनिकांसह स्थानिकांसह शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असताना अचानक शेतक-यांनी त्यांचं भाषण थांबवलं असल्याचं पहवयास मिळालं. उद्धव ठाकरे राम मंदिरावर बोलत होते. परंतु शेतक-यांनी त्यांना कांद्यावर बोलण्याची मागणी केली. या मागणीवरुन शेतक-यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.  शेतकऱ्यांच्या घोषणाबाजीमुळे उद्धव ठाकरे यांना भाषण थांबवावं लागलं.

दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंना शेतक-यांपर्यंत माईकचा आवाज पोहोचत नसेल अशी शंका वाटली. व्यासपीठावरून त्यांनी आवाज येत नाही का? असा सवालही केला. तेव्हा काही शेतकऱ्यांनी उभं राहून कांदा-कांदा अशी घोषणा केली. तेव्हा व्यासपीठावर बसलेल्या सेना नेत्यांनी कांद्यावर बोलण्यास सांगत आहे असं सांगितलं तेव्हा उद्धव यांनी, मी कांद्यावर बोलणारच आहे, आधी माझं हे बोलणं संपवू द्या, तुम्ही कांदा राखून ठेवा, आधी यांचा वांदा करू द्या, जेव्हा हे बेशुद्ध पडतील तेव्हा त्यांच्या नाकाला कांदा लावू असा टोला लगावला. त्यानंतर शेतक-यांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली.

COMMENTS