“फादर्स डे” निमित्त महाराष्ट्राच्या राजकारणातील पिता-पुत्र/पुत्रीबद्दल जाणून घेऊया

“फादर्स डे” निमित्त महाराष्ट्राच्या राजकारणातील पिता-पुत्र/पुत्रीबद्दल जाणून घेऊया

स्व.बाळासाहेब ठाकरे-उद्धव ठाकरे

मराठी अस्मितावर कडाडून बोलणारे बाळासाहेबांनी एक कार्टुनिस्ट म्हणून सुरवात केली होती..
त्यानंतरच्या काळात या नावाने देशभर आपल्या नावाचा ठसा उमटवला..
त्यांच्या आक्रमक भाषण शैलीचा अख्खा महाराष्ट्र दिवाना होता. त्यांच्या नंतर त्यांचे पुतणे राज ठाकरे यांना त्यांचा राजकीय वारसदार मानल जात होत.
परंतु तस न होता उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्यध्यक्षपदी निवड करण्यात आली. आज उद्धव ठाकरे हे राज्यातील प्रमुख पक्षातील एका पक्षाचं नेतृत्व करीत आहे.
2014 निवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 63 आमदार आणि 18 खासदार निवडून आले होते.

शरद पवार-सुप्रियाताई सुळे

50वर्ष संसदीय कारकीर्द असलेले शरद पवार हे देशातील महत्वाचे नेते मानले जातात.
त्यांनी केंद्रात संरक्षण,कृषी हे खाते महत्वाचे खाते भूषविले असून कृषिमंत्री असताना त्यांनी ऐतिहासिक शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही होते.
त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे ह्या राजकारणात त्यांचा वारसा चालवीत आहेत. महिला सक्षमीकरणा साठी त्या कार्य करीत असून त्या लोकसभेत राष्ट्रवादीच प्रतिनिधित्व ही करीत आहेत.

नारायण राणे -नितेश राणे

बाळासाहेबांच्या तालमीत घडलेले नारायण राणे यांची शैली आक्रमक आहे.
राज्यातील विविध मंत्रीपदे त्यांनी सांभाळली असून ते युतीच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्रीही होते. शिवसेनेतून राजकारणाची सुरवात करणारे राणे नुकतेच काँग्रेसमधून भाजपच्या गोटात गेले असून ते राज्यसभेचे खासदारही आहेत. त्यांचे चिरंजीव नितेश राणे हे अगदी त्यांच्याच सारखे आक्रमक राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. नितेश हे सध्या काँग्रेसचे आमदार असून स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ही आहेत.

डॉ.पदमसिंह पाटील- राणाजगजितसिंह पाटील

पदमसिंह पाटील हे मागील 40 वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात आपलं पाय रोवून आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे पदमसिंह पाटील हे राज्याचे गृहमंत्री ही राहिले आहेत. डॉ. पदमसिंह ज्या प्रकारे आपल्या आक्रमक शैलीने प्रसिद्ध आहेत तशे त्यांचे पुत्र राणा पाटील हे अतिशय शांत, संयमी आणि अभ्यासू राजकारणी आहेत.. ते rराज्यमंत्री हि होते ,सध्या कळंब-उस्मानाबाद मतदार संघाचे आमदार आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे-पंकजा मुंडे

चळवळीतील नेता म्हणून ओळख असलेले व महाराष्ट्रात भाजप गावागावात पोहचविण्यात यशस्वी झालेले नेते म्हणजे स्व.गोपीनाथ मुंडे.
केंद्रात भाजपाची सत्ता आली आणि गोपीनाथ मुंडेंच अकाली दुर्दैवी निधन झालं. आणि त्यांचा वारसा चालवण्यासाठी त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या पुढे आल्या. आज त्या राज्यात महिला व बालविकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत.

 

 

 

 

विलासराव देशमुख – अमित देशमुख

स्व. विलासराव देशमुख यांचा बाभळगावच्या सरपंच पदापासून ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा होता.
मुख्यमंत्री पदी असताना त्यांनी विविध विषय हाताळली आणि यशस्वी ही केली. लातूरचा त्यांनी चेहरा मोहरा बदलला. मात्र यांचे पुत्र अमित देशमुख यांना राजकारनात हवी इतकी उंची गाठता आली नाही. ते सध्या लातूरचे आमदार असून विलासराव गेल्यापासून ते जिल्ह्यातील काँग्रेसच नेतृत्व करीत आहेत.

सुभाष देशमुख हे राज्यतील भाजपचे प्रमुख नेत्यांपैकी एक असून ते सोलापूर जिल्ह्यातून आमदार म्हणून निवडून येतात. ते साध्य महाराष्ट्राचे सहकार मंत्री आहेत. त्यांचे चिरंजीव रोहन देशमुख हे लोकमंगल समूह अंतर्गत विविध समाज कार्य करत असतात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रोहन देशमुख हे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून अपक्ष लढले होते पण त्यात त्यांना अपयश आले. 2019 च्या निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे ते भाजपा चे उमेदवार असणार अशीही चर्चा आहे

सुशीलकुमार शिंदे-प्रणिती शिंदे

कोर्टातील एक कर्मचारी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व देशाचे गृहमंत्री असा थक्क करणारा सुशीलकुमार यांचा राजकीय प्रवास आहे. अजमल कसाब, अफझल गुरू या दहशतवाद्याना फासावर लटकवण्यात सुशीलकुमार शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे याही राजकारणात सक्रिय असून त्या सोलापूर मतदार संघातून आमदार आहेत.

सुनील तटकरे-अनिकेत तटकरे

सुनील तटकरे हे राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. आघाडी सरकारच्या काळात ते जलसंपदा मंत्री ही होते, त्यांनी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून ही काम पाहिलं आहे. ते शरद पवारांच्या विश्वासू सहकारी पैकी एक मानले जातात.
त्यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांनी नुकत्याच झालेल्या कोकण विधानपरिषद निवडकीत बाजी मारून विधिमंडळात प्रवेश केला आहे.

महापॉलिटिक्सच्या वाचकांना पितृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

COMMENTS