अजित पवारांना धक्का, कट्टर समर्थक माजी आमदार साहेबराव पाटील यांचा भाजपात प्रवेश !

अजित पवारांना धक्का, कट्टर समर्थक माजी आमदार साहेबराव पाटील यांचा भाजपात प्रवेश !

जळगाव – राष्ट्रवादीला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे राष्ट्रवादीचे माजी सहयोगी अपक्ष आमदार साहेबराव पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत साहेबराव पाटलांनी अमळनेर येथे बाजार समितीच्या कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत साहेबराव पाटील अमळनेर मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार म्हणून जाणं पसंत केलं. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. नेहमी पवारांचे गुणगान गाणारे साहेबराव पाटील यांच्या भाजप प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

COMMENTS