मग शरद पवारांची गणणा तुम्ही बाप बदलणाऱ्यांच्या औलादीमध्ये करणार का? – गणेश नाईक

मग शरद पवारांची गणणा तुम्ही बाप बदलणाऱ्यांच्या औलादीमध्ये करणार का? – गणेश नाईक

नवी मुंबई – आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईक यांना आम्ही बाप बदलणाऱ्यांमधील औलादी नाहीत असं म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याला गणेश नाईकांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी देखील तीन वेळा पक्ष बदलला आहे. मग शरद पवारांची गणणा तुम्ही बाप बदलणाऱ्यांच्या औलादीमध्ये करणार आहात का?, असा प्रश्न गणेश नाईक यांनी आव्हाड यांना विचारला आहे.

दरम्यान माणूस एकाएकी पक्ष बदलत नाही. आपल्या समाजकारण, राजकारणाला गती यावी किंवा स्वाभिमानाचं जतन व्हावं, या आणि अशा बऱ्याच गोष्टींतून माणूस पक्षांतर करतो,
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पूर्वी काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये असताना ते मंत्रिमंडळातही आले होते. समाजकारण आणि राजकारणात गती मिळावी म्हणून त्यांनी येस काँग्रेसची स्थापना केली. त्यांनी पुन्हा एकदा सरकारचं नेतृत्व केलं. कालांतराने औरंगाबादमध्ये पुन्हा काँग्रेसचे दिवंगत पक्षाध्यक्ष राजीव गांधीच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परत पुढे 1999 साली स्वाभिमानाच्याच विचारांवर त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे आता माझं जितेंद्र आव्हाडांनासुद्धा सांगणं आहे की, शरद पवार यांनीदेखील तीन वेळा पक्ष बदलला आहे. मग शरद पवारांचीदेखील गणणा तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादीमध्ये करणार आहात का? असं नाईक यांनी म्हटलं आहे.

COMMENTS