सरपंच आरक्षण सोडत महिन्याभर निघणार : हसन मुश्रीफ

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी सरपंचपदाचे आरक्षण काढण्याले जात होते. तेव्हा मोठ्या चुरशीने निवडणुका लढल्या जात होत्या. आता निवडणुकांनंतरच सरपंचपदाचं आरक्षण जाहीर केलं जाईल. त्यामुळे सर्व ठिकाणी उत्साहात आणि शांतते निवडणुका पार पडल्या. महिन्याभरात जिल्हाधिकारी सरपंचाच्या आरक्षण सोडती काढतील, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले.

आतापर्यंत महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाची सोडत जाहीर होत होती. पण सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढल्यामुळेच नवा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच 14 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

कोरोना महामारींमुळे ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र एका प्रशासकाकडे जास्त गावांचा कारभार देण्यात आला होता. आता एकच प्रशासक 4-5 ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामसभांवर 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्र्यांनी दिली आहे.

COMMENTS