गुहागरमध्ये राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांना धक्का, भाजप उमेदवार तिस-या स्थानावर !

गुहागरमध्ये राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांना धक्का, भाजप उमेदवार तिस-या स्थानावर !

रत्नागिरी – गुहागर नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांना जोरदार धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहर विकास आघाडीचे राजेश बेंडल विजयी झाले आहेत. त्यांना 2446 मते पडली. बेंडल यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक कनगुटकर यांचा पराभव केला. कनगुटकर यांना 1311 मते मिळाली. तर भाजपचा उमेदवार थेट तिस-या क्रमांकावर फेकला गेला. भाजपचे रविंद्र बागकर यांना केवळ 980 मते मिळाली.

नगराध्यक्षपदासोबतच नगरपंचायतीमध्येही शहरविकास आघाडीनं बाजी मारली आहे. एकूण 17 जागांपैकी 9 जागा जिंकत शहर विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपनं 6 जागा जिंकत दुस-या क्रमांकाच्या जागा पटकावल्या आहेत. तर राषट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव आणि भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदांनी दोघांनाही धूळ चारली.

COMMENTS