गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर !

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर !

नवी दिल्ली –  गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबरला मतदान होणार आहेत. तर 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अशी माहिती आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत दिली. 

गुजरात विधानसभा निवडणुकी दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 89 मतदारसंघ तर दुस-या टप्प्यात 93 मतदारसंघ मतदान होईल.  पहिला टप्प्यासाठी अर्ज करण्याची तारीख 21 नोव्हेंबर असून अर्ज मागे घेण्याची तारीख 24 नोव्हेंबर आहे. तर अर्जांची  छाननी 22 नोव्हेंबरला होणार आहे. दुसरा टप्प्यासाठी 14 डिसेंबरला मतदान होणार असून 18 डिसेंबरला मतमोजणी आहे.   50,128 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रीया पार पडेल,  4 कोटी 33 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

गुजरातचा निवडणूक कार्यक्रम हिमाचल प्रदेशसोबत जाहीर होणं अपेक्षीत होतं. मात्र ते झालं नाही. त्यावरुन विरोधकांनी भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यात मिलीभगत असल्याचा आरोप केला होता.

गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. यंदा प्रथमच काँग्रेसनं भाजपला तगडं आव्हान दिलं आहे. तीन युवक नेत्यांची साथ काँग्रेसला मिळाली आहे. देशाच्या निवडणुकीची दिशा या निकालातून स्पष्ट होणार आहे.

 

COMMENTS