गुजरातमध्ये राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून  काय मिळाला प्रतिसाद ?

गुजरातमध्ये राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून काय मिळाला प्रतिसाद ?

गुजरातमध्ये भाजप विरोधी मतांची फूट टाळण्यासाठी काँग्रेसकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाढिया यांनी ही माहिती  दिली आहे.

याच वर्षी राज्यसभा निवडणुकीत दोन्ही पक्षात आलेल्या कटू संबंधानंतर आता दोन्ही पक्षाकडून आघाडीसाठी प्रयत्न केले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करेल असं वक्तव्य केलं होतं. त्यानुसार प्रफुल्ल पटेल यांनी आघाडीचा प्रस्ताव काँग्रेसपुढे ठेवला आहे. त्याला काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गुजरातमध्ये 9 ते 10 जागा लढवण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची एक दोन दिवसात बैठक होऊन आघाडीबाबतचा अंतिम निर्णय होईल असं अर्जुन मोढवाढिया यांनी सांगितलं आहे.

COMMENTS