हर्षवर्धन पाटलांच्या कन्येची राजकारणात एण्ट्री, ‘या’ ठिकाणी लढवणार निवडणूक !

हर्षवर्धन पाटलांच्या कन्येची राजकारणात एण्ट्री, ‘या’ ठिकाणी लढवणार निवडणूक !

इंदापूर – काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी राजकारणात एण्ट्री मारली आहे.
इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून अंकिता पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. अंकिता पाटील आपला उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेस उमेदवार अंकिता पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

दरम्यान बावडा-लाखेवाडी गटाच्या काँग्रेसच्या सदस्या आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे रिक्त जागेसाठी 23 जूनला पोटनिवडणूक होत आहे. सर्वसमावेशक उमेदवार म्हणून अंकिता पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी शहाजीनगरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर आज त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अंकिता पाटील यांचं शिक्षण परदेशात झालं आहे. त्या सध्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष तसंच इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत.

COMMENTS