मराठा आंदोलकांनी खासदार हीना गावित यांची गाडी फोडली !

मराठा आंदोलकांनी खासदार हीना गावित यांची गाडी फोडली !

धुळे – भाजपच्या खासदार हीना गावित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केला असल्याची माहिती आहे.  धुळ्यामध्ये मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी फोडली असून येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमलेल्या आंदोलकांनी गावित यांच्या गाडीच्या काचा फोडल्या असल्याची माहिती आहे. आंदोलकांचे म्हणणे ऐकण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी त्यांच्या गाडीवरच हल्ला केला आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात आज धुळे, नंदुरबार येथील डीपीडीसीची बैठक होती. या बैठकीसाठी खासदार हीना गावित, सुभाष भामरे,  अनिल गोटे आमदार कृणाल पाटील, जयकुमार रावल, आदी उपस्थित होते. बैठक सुरू होण्याआधीच मराठा आंदोलक याठिकाणी ठान मांडून बसले होते. बैठक संपल्यानंतर सर्वप्रथम बाहेर आलेल्या खासदार गावित यांना आंदोलकांनी रोखले. त्यांनी आरक्षणाबाबत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र गावित यांनी त्यास नकार दिल्याने आंदोलकांनी गावित यांची गाडी फोडली. या प्रकरणात पोलिसांनी १५ ते २० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

 

 

COMMENTS