मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ, सुप्रीम कोर्टाची नोटीस !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ, सुप्रीम कोर्टाची नोटीस !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अ़चणीत वाढ वाढ झाली असून त्यांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी नोटीस बजावली आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी प्रकरणांचा समावेश केला नसल्याची याचिका त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती. या सुनावणी दरम्यान कोर्टानं त्यांना नोटीस बजावली आहे.

दरम्यान या दोन प्रकरणाची माहिती फडणवीस यांनी हेतूपुरस्पर दडविली. त्यामुळे उमेदवाराविषयी जाणून घेण्याचा मतदाराचा हक्क डावलण्यात आला. यामुळे फडणवीस यांची निवड रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी १९९७ आणि २००० मधील फौजदारी प्रकरणात जामीन घेतला आहे. मात्र, त्यांनी न्यायालयाने दखल घेतलेल्या प्रकरणांचा तपशील विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना दिलेला नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. त्यामुळे कोर्टानं त्यांना नोटीस बजावली आहे.

COMMENTS