मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक !

मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक !

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सोमवारी म्हणजेच उद्या दुपारी 12 वाजता ही बैठक मातोश्रीवर पार पडणार आहे. या बैठकीला राज्यातील शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विधीमंडळामध्ये सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्यानंतर उद्या शिवसेनेची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात काय चर्चा केली जाणार आहे. याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

दरम्यान सकल मराठा मोर्चानं मुंबई बंदची हाक दिल्यानंतर शिवसेनेनं मराठा मोर्चाला पाठिंबा दर्शवला होता. परंतु मुंबई बंदला पाठिंबा नसल्याचंही त्यावेळी शिवसेनेनं जाहीर केलं होतं. त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी उद्धव ठाकरे हे बैठक घेणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरे हे उद्या काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS