पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानचं पंतप्रधान मोदींना पत्र, केली ‘ही’ विनंती !

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानचं पंतप्रधान मोदींना पत्र, केली ‘ही’ विनंती !

नवी दिल्‍ली – पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्र लिहिलं आहे.  भारत आणि पाकिस्‍तानमध्ये चर्चा सुरु करण्यासाठी हे पत्र लिहिले असून भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यात बैठक व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रांकडे विनंती करण्यात आली असल्याची माहिती आहे. ऑक्‍टोंबर महिन्यात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण बैठक होणार आहे.या बैठकीत सुषमा स्वराज यांनी कुरैशी यांचीही भेट घ्यावी यासाठी इम्रान खान आग्रही आहेत.

दरम्यान भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी दहशतवाद,काश्मीर प्रश्न आणि एकमेकांशी संबंधित असलेले इतर मुद्दे चर्चेने सोडवले जावेत  अशी विनंती इम्रान खान यांनी या पत्रात केली आहे..नरेंद्र मोदी यांनी गेल्‍या महिन्यात इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्‍यानंतर खान यांचे अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहिले होत. त्यानंतर इम्रान खान यांनी पंतप्रधान झाल्यानंतर हे पहिलं पत्र लिहिलं आहे.

 

COMMENTS