पाकिस्तान – 11 ऑगस्टला इम्रान खान घेणार पंतप्रधानपदाची शपथ, पंतप्रधान मोदींना निमंत्रण ?

पाकिस्तान – 11 ऑगस्टला इम्रान खान घेणार पंतप्रधानपदाची शपथ, पंतप्रधान मोदींना निमंत्रण ?

इस्लामाबाद पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा ११ ऑगस्टला पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पाकिस्तानमध्ये जय्यत तयारी सुरु असून तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान हे  पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला जगातील अनेक नेत्यांना निमंत्रित केलं जात असून यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील निमंत्रण दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निमंत्रण मिळालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला जाणार का याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान पाकिस्तानध्ये काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाला एकूण ११५ जागा मिळाल्या आहे. तेहरिक-ए-इन्साफ पक्ष निवडणुकीत विजयी झाल्यावर नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांचे फोन करून अभिनंदन केले होते. निवडणूक जिंकल्यावर भारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारण्याचे संकेतही इम्रान खान यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात भारत-पाकमधील संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानमध्ये जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

COMMENTS