लोकसभेत सुषमा स्वराज पाकवर भडकल्या !

लोकसभेत सुषमा स्वराज पाकवर भडकल्या !

वी दिल्ली –  कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांना पाकिस्तानात देण्यात आलेल्या वागणुकीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज गुरुवारी लोकसभेत पाकवर भकडल्या होत्या. पाकिस्तानवर जोरदार टीका करत पाकिस्ताननं मानवाधिकाराचे उल्लंघन केलं असल्याचं त्या म्हणाल्या. पाकिस्तानने या भेटीदरम्यान कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीला सुरक्षेच्या कारणास्तव कपडे बदलायला सांगितले. कुलभूषण जाधव यांच्या आईला साडी नेसायचीच सवय असूनही त्यांना बळजबरीने सलवार-कुर्ता परिधान करायला सांगितला. तसेच त्यांना मंगळसूत्र, टिकली आणि बांगड्याही काढून ठेवायला सांगितल्या. त्यामुळे पाकिस्ताननं आपली लायकी दाखवली असल्याचं त्या म्हणाल्या. लोकसभेत निवेदनादरम्यान त्यांनी पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला असल्याचं पहावयास मिळालं आहे.

दरम्यान कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांनी 25 डिसेंबरला पाकिस्तानात जाऊन कुलभूषण जाधव यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडला. तसेच मराठी ही जाधव कुटुंबाची मातृभाषा आहे. मातृभाषेत संवाद साधणे केव्हाही सोपे पडते. त्यामुळे कुलभूषण यांच्या आईने त्यांच्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पाकिस्तानने त्यांचा इंटरकॉम फोन बंद केला असल्याचंही स्वराज म्हणाल्या. त्यामुळे माणुसकीच्या भाषा करणा-या पाकिस्तनाने आपली लायकी दाखवली असल्याचंही स्वराज यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

 

COMMENTS