काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली ‘ही’ मोठी मागणी !

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली ‘ही’ मोठी मागणी !

पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अनेक विरोधी पक्षांना एकत्रित घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीनं महाआघाडीची स्थापना केली आहे. परंतु पक्षांतर्गत जागावाटपामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी आली असल्याचं दिसत आहे. कारण इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसला जाहीर करा, तरच लोकसभा निवडणुकीत काम करु अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत काम करुनही राष्ट्रवादीकडून दगाफटका होत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबतची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रमेश बागवे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील , आमदार संग्राम थोपटे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे केली आहे. इंदापूर नगरपरिषद इमारत भूमीपूजन कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमादरम्यान या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्यांपुढे मागणी केली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच आघाडीत बिघाडी आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

COMMENTS