चित्रपटातील ट्रेलरमध्येच इतिहासाचे विडंबन मग चित्रपटात काय असेल ? इंद्रजित सावंत

चित्रपटातील ट्रेलरमध्येच इतिहासाचे विडंबन मग चित्रपटात काय असेल ? इंद्रजित सावंत

मुंबई – इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांनीही तान्हाजी चिञपटावर आक्षेप घेतला आहे. चित्रपटातील ट्रेलरमध्येच इतिहासाचे विडंबन मग चित्रपटात काय असेल. सिनेमॅटिक लिबरटी मान्य पण इतिहासाचे विडंबन अमान्य. माझी भूमिका कोणास पटो अथवा न पटो पण मऊ मेनाहूनही आम्ही विष्णूदास कठोर वज्रासी भेदू ऐसे ! भलेतरी देऊ कासेची लंगोटी नाथाळाच्या माथी हाणू काठी! या तुकोबारायांच्या विचाराने चालणारच असल्याचं इंद्रजित सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित अभिनेता अजय देवगनची मुख्य भूमिका असलेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून ‘संभाजी ब्रिगेड’ चांगलीच आक्रमक झाली आहे. ‘तान्हाजी’च्या ट्रेलरमध्ये संत रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांना काहीतरी ‘फेकून’ मारत असल्याचं दाखवल्याने ‘संभाजी ब्रिगेड’ने हे दृश्य वगळण्याची मागणी केली आहे. अन्यथा ‘तान्हाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवय्रात सापडला आहे.

COMMENTS