जळगाव  महापालिकेवर भाजपचा झेंडा !

जळगाव  महापालिकेवर भाजपचा झेंडा !

जळगाव – जळगाव महापालिकेत पहिल्यांदाच शिवसेनेचे हेविवेट नेते सुरेश दादा जैन यांना तडगा झटका बसला आहे. जळगाव महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे. जाहीर झालेल्या कल आणि निकालानुसार एकूण 75 जागांपैकी भाजपला 45 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर शिवसेनेला सुमारे 30 जागांवर आघाडी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागांवर आघाडी मिळाली आहे. इतर दोन जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांना मात्र अजून इथे एकही जागावर आघाडी मिळालेली नाही.

गेली 30 वर्ष या महापालिकेवर सुरेश दादा जैन यांचं वर्चस्व होतं. ते आता खालसा होताना दिसत आहे. भाजपनं ही निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी निवडणुकीची संपूर्ण सुत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली होती. त्यांना राज्यपातळीवरील नेत्यांचंही मोठं सहकार्य झालं होतं. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पूर्ण ताकद दिली होती. एकनाथ खडसे काही अपवाद वगळता या निवडणुकीपासून अलिप्त राहिले होते. तरीही भाजपनं जोरदार विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे.

COMMENTS

Bitnami