सांगलीत 60 तर जळगाव महापालिकेत सरासरी 57 टक्के मतदान !

सांगलीत 60 तर जळगाव महापालिकेत सरासरी 57 टक्के मतदान !

मुंबई – सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात आलं. सांगली महापालिकेत सरासरी 60 टक्के मतदान झालं असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून जळगाव महापालिकेत सरासरी 57 टक्के मतदान झालं  असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी मतदान पार पडलं. याठिकाणी सरासरी 60 टक्के मतदान झाले असल्याचा अंदाज आहे.तर जळगाव महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील 75 जागांसाठी मतदान पार पडलं. मनपा प्रशासनाने केलेल्या मतदान जागृती अभियानानुसार यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता होती. परंतु या वर्षीही मतदानाच्या टक्केवारीत हवी तेवढी वाढ झाली नसल्याचं दिसत आहे. दरम्यान जळगाव महापालिकेत मतदानासाठी मतदारांना उमेदवारांनी पैसे वाटप केल्याच्या प्रचंड तक्रारी करण्यात आल्या असल्याची माहिती आहे. दरम्यान या महापालिकांमधील निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत पहायला मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS