आनंदीबेन पटेलांच्या विधानाला मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांचं प्रत्युत्तर!

आनंदीबेन पटेलांच्या विधानाला मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांचं प्रत्युत्तर!

मुंबई- नरेंद्र मोदी यांच्याशी माझं लग्न झालं असून, ते माझे राम आहेत. असं नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी आनंदीबेन यांच्या मोदी अविवाहित असल्याच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन यांनी अंगणवाडीच्या एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी हे अविवाहित असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर जशोदाबेन यांनी आपली नाराजी दर्शवली आहे.

दरम्यान आनंदीबेन यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत जशोदाबेन यांनी एका व्हिडिओद्वारे म्हटलं आहे की, नरेंद्र मोदी यांच्याशी माझा विवाह झाला असून मी त्यांना माझे राम मानते. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरताना त्यात ते विवाहित असल्याचं नमूद केलं होतं आणि पत्नी म्हणून माझं नावही होतं असे त्या म्हणाल्या आहेत.पुढे त्या म्हणाल्या की एक सुशिक्षित महिलेने एका शिक्षिकेबद्दल असं बोलणं म्हणजे दुर्दैवास्पद आहे. त्यांच्या या वक्तव्याने देशाच्या पंतप्रधान या प्रतिमेला धक्का पोहचला आहे. दरम्यान आनंदीबेन यांचं वक्तव्य साफ खोटं आहे हे सांगण्यासाठी मला हा व्हिडिओ बनवावा लागला असंही त्या म्हणाल्या.

COMMENTS