छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, याचा राग फडणवीस आणि भाजपला का? – जयंत पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, याचा राग फडणवीस आणि भाजपला का? – जयंत पाटील

मुंबई – देवेंद्र फडणवीसांनी शिस्त पाळायला हवी होती, उद्धव ठाकरे आयुष्यात पहिल्यांदाच सभागृहात पाय ठेवत होते, त्यांचं स्वागत करणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी तसं केलं नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे मॆत्री जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
महाविकासआघाडी सरकारनं आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील आपलं निवेदन मांडलं. यावेळी त्यांनी फडणवीसांवर टीका केली.

दरमेयान आयुष्यातील दैवताचा उल्लेख केला, खासकरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपला का राग आला? असा सवालही जयंत पाटील यांनी विचारला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं, शाहू महाराजांचं नाव घेतलं, महात्मा फुलेंचं नाव घेतलं, या महात्म्यांचं नाव घेताना, समोर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या लोकांना का राग आला? या सर्वांच्या मनात महापुरुषांबाबत असूया का आहे? आज नाही तर पिढ्यानपिढ्या यांच्या मनात असूया आहे. तो राग त्यांच्यामधून बाहेर आला, याचं आम्हाला दु:ख वाटतंय असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

COMMENTS