खातेवाटप कधी होणार?, जयंत पाटलांनी दिली माहिती!

खातेवाटप कधी होणार?, जयंत पाटलांनी दिली माहिती!

मुंबई – राज्यात महाविकासआघाडी सरकारचा शपथविधी पार पडून आठवडा उलटला असला तरी अद्याप मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीनंतर अद्याप एकाही मंत्र्याला खातेवाटप झालेले नाही.
त्यामुळे खातेवाटप कधी होणार याबाबतची उत्सुकता राज्याला लागली आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खातेवाटप दोन दिवसांत पूर्ण होईल. सर्वकाही दोन दिवसांत सुरळीत पार पडेल. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजून काही माहिती नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच माहिती देवू शकतील असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

गृहखातं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांभाळतील – संजय राऊत

महाविकास आघाडीचं खातेवाटप जवळपास निश्चित झालं असून महत्त्वाचं असं गृहखातं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांभाळतील असे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. तसेच संजय राऊत यांनी महसूल खाते काँग्रेसला तर अर्थखाते राष्ट्रवादीला मिळण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे फडणवीस सरकारप्रमाणेच ‘मुख्यमंत्रीच गृहमंत्री’ या पॅटर्नची
पुनरावृत्ती होण्याची चिन्हं आहेत.

COMMENTS