येत्या आठवड्यात आघाडीच्या जागावाटपाची चर्चा होणार – जयंत पाटील

येत्या आठवड्यात आघाडीच्या जागावाटपाची चर्चा होणार – जयंत पाटील

धुळे – येत्या आठवडाभरात आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा केली जाणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. तसेच सुरूवातीला लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा करण्यात येणार असून या चर्चेनंतर मग विधानसभेचा विषय हाती घेतला जाणार असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात कोणत्या पक्षाला कुठे आणि किती जागा दिल्या जाणार आहेत हे चित्र लवकरच स्पष्ट होणार असल्याचं दिसत आहे. धुळ्यातील एका कार्यक्रमात जयंत पाटील हे बोलत होते.

दरम्यान यावेळी त्यांनी भाजप सरकावर जोरदार टीका केली आहे. तसेच संनातनची पाळेमुळे शोधुन काढण्याची आवश्यकता असून अटक केलेल्या संशयीतांकडे आढळलेली यादी हा गंभीर विषय असल्याचंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS