राष्ट्रवादीत फूट नाही, शरद पवार सांगतील तेच होईल -जयंत पाटील

राष्ट्रवादीत फूट नाही, शरद पवार सांगतील तेच होईल -जयंत पाटील

मुंबई – राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप घडला असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमॆत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे अनेक आमदार भाजपच्या पाठिशी असल्याची चर्चा आहे. परंतु पक्ष शरद पवार यांच्यासोबत आहे. ते जो निर्णय घेतील तेच होईल असं राष्ट्रवादीचे प्पदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज सकाळी पुन्हा बैठक घेण्याचं ठरलं होतं. त्यामुळे आज हा प्रश्न बराच सुटला असता. राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची चर्चा कृपया करु नका. पक्ष शरद पवार यांच्यासोबत राहिल, अशी मला खात्री आहे. ते जे सांगितील तेच होईल. आमदारांना कोठेही हलवण्याची गरज नाही. माझा आमदारांशी संपर्क झाला आहे. थोडासा वेळ माध्यमांनी थांबावं. अधीर होऊ नका. मी शरद पवार यांच्याकडे चाललो आहे. तेथे जाऊन मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच पुढील माहिती देतो, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS