राज्यासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा टाळण्याचा सरकारचा डाव – जयंत पाटील

राज्यासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा टाळण्याचा सरकारचा डाव – जयंत पाटील

मुंबई – राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. १९ ते ३० नोव्हेंबरदरम्यान हे अधिवेशन पार पडणार आहे. या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज फक्त ७ दिवस चालणार आहे. त्यामुळे या विरोधक आक्रमक झाले असून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. येणारे हिवाळी अधिवेशन केवळ ७ दिवसांचे असणार आहे, राज्यात प्रचंड महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्यासाठी किमान 3 आठवड्यांचे तरी अधिवेशन असावे अशी आमची मागणी होती, मात्र अत्यंत कमी दिवसांचे अधिवेशन ठेवून राज्यासमोरील महत्वाच्या प्रश्नांची चर्चा टाळण्याचा सरकारचा डाव दिसत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS