राष्ट्रवादीला धक्का, जयदत्त क्षीरसागर यांनी घेतला ‘हा’ निर्णय !

राष्ट्रवादीला धक्का, जयदत्त क्षीरसागर यांनी घेतला ‘हा’ निर्णय !

बीड – बीडमधील राष्ट्रवादीचे नाराज आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका जाहीर केली आहे. क्षीरसागर यांनी भाजपला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. भाजपला मदत करून विजयाची गुढी उभारा. डॉ. प्रीतम मुंडे यांना मतदान करा,’ असं जाहीर आवाहन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून आपली भूमिका जाहीर केली आहे.

दरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी आपण कोणत्या पक्षात जाणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. याचा निर्णय 18 एप्रिलला घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. या बैठकीतून आमदार क्षीरसागर यांनी आपला लढा कुणाविरुद्ध आहे, यबाबत अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. ‘लढा…गुंडगिरी विरोधात, घरफोड्यांविरोधात आणि जातीयवाद्यांविरोधात,’ अशी वाक्य क्षीरसागर यांच्या बैठकीच्या स्टेजवरील बॅनरवर लिहिण्यात आली होती.

तसेच या बैठकीत क्षीरसागर समर्थकांकडून धनंजय मुंडेंसह पक्ष नेतृत्वावर सडकून टीका करण्यात आली. ‘मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,’ असं म्हणत धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्यात आला.

COMMENTS