माझ्यावरील सर्व आरोप खोटे, नवाब मलिकांविरोधात गुन्हा दाखल –जयकुमार रावल

माझ्यावरील सर्व आरोप खोटे, नवाब मलिकांविरोधात गुन्हा दाखल –जयकुमार रावल

धुळे – जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रूनुकसानिचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. जिल्ह्यातील अनेक शेतक-यांच्या जमिनी जयकुमार रावल यांनी कवडीमोल भावाने घेऊन त्या सरकारला कोट्यवधी रुपयांना विकल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर जयकुमार रावल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून माजी मत्री हेमंत देशमुख यांनी दिलेल्या माहीतीवरुन त्यांनी हा आरोप केला असल्याचं रावल यांनी म्हटलं आहे. तसेच मलिक यांच्यावविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहितीही रावल यांनी दिली आहे.

दरम्यान विखरण येथील धर्मा पाटील यांच्या निधनानंतर पालकमंञी जयकुमार रावल यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे. नवाब मलिक यांनी बिनाबुडाचे आरोप केले आहेत. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत आपण आब्रूनुकसानीचा दावा मलिकांविरोधात ठोकणार असल्याचंही रावल यांनी म्हटलं आहे.

COMMENTS