“अस्वस्थ महाराष्ट्रात आगीत तेल ओतण्याचं काम रावसाहेब दानवे करत आहेत !”

“अस्वस्थ महाराष्ट्रात आगीत तेल ओतण्याचं काम रावसाहेब दानवे करत आहेत !”

मुंबई – भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अस्वस्थ महाराष्ट्रात आगीत तेल ओतण्याचं काम केलं असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्वीट केलं असून, यामध्ये त्यांनी आजचे विधान की ” मराठे ओबीसी असल्याचे पुरावे सापडले” अस्वस्थ असलेल्या महाराष्ट्रात आगीत तेल ओतण्याचे काम आहे,* मराठे ओबीसी मध्ये आरक्षण मागत नाहीत ओबीसी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीत. मग आगीत तेल लावण्याचे काम श्री दानवे साहेब कशासाठी करत आहेत? असा सवाल आव्हाड यांनी रावसाहेब दानवे यांना केला आहे.

दरम्यान रावसाहेब दानवे यांनी काल मराठा आरक्षणावर तोडगा निघाला असल्याचा दावा केला होता. हैद्राबाद संस्थानात मराठे ओबीसीमध्ये होते. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीचा दर्जा देता येईल. हा मुद्दा सरकारच्या विचाराधीन असून सरकार उच्च न्यायालयात हीच बाजू मांडणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आव्हाड यांनी दानवेंवर टीका केली आहे.

COMMENTS