पत्रकारांसाठी देशातील सर्वोत्तम पेन्शन योजना – मुख्यमंत्री

पत्रकारांसाठी देशातील सर्वोत्तम पेन्शन योजना – मुख्यमंत्री

अमरावती – राज्यातील पत्रकारांसाठी पेन्शन योजना असावी, अशी मागणी पत्रकारांकडून मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. शासनाचे त्या दृष्टीने काम सुरू आहे. पेन्शन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून सध्या देशात ज्या राज्यांमध्ये पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू आहेत त्यापैकी सर्वोत्तम पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांसाठी लागू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अमरावती पत्रकार भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना दिली.

पत्रकार सदैव आव्हानांचा सामना करत असतात. त्यांना पेन्शन असावी, अशी मागणी सर्वच पत्रकारांकडून होत आहे. सध्या देशातील ज्या राज्यांमध्ये पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू आहेत त्यापैकी १४ राज्यांमध्ये सुरू असलेली पेन्शन योजना कुचकामी आहे. मात्र, महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी आम्ही सर्वोत्तम योजना तयार करत आहोत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच पत्रकारांना माेफत नाही, मात्र माफक दरात घरे कसे मिळतील यासाठी प्रयत्न केला जात आहे. वृत्तपत्रांच्या जाहिरात दरात वाढ करण्याबाबतची मागणी झालेली आहे. त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

COMMENTS