केडीएमसीच्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेवकांचा राडा, कार्यकर्त्यांसह आपापसातच भिडले ! VIDEO

केडीएमसीच्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेवकांचा राडा, कार्यकर्त्यांसह आपापसातच भिडले ! VIDEO

मुंबई – कल्याण डोंबिवली महापालिकेची आज महासभा होती. या सभेत मोठागाव-ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या उतारमार्गाचा विषय सुरू होता. या विषयावर चर्चा सुरू असतानाच अचानक डोंबिवलीतले शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे या दोघांमध्ये वाद झाला.

या वादाचे पडसाद लगेचच सभागृहाबाहेर जमलेल्या या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटले. चौथ्या मजल्यावरील सभागृहाबाहेर दोन्ही नगरसेवकांचे कार्यकर्ते आपसात भिडले आणि मोठा गोंधळ उडाला. महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनाही परिस्थिती हाताळणं आटोक्याबाहेर झाल्यानं अखेर शिवसेनेच्याच इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत हा वाद शांत केला.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत यापूर्वीही दोन नगरसेवकांमध्ये वाद झाल्याच्या घटना घडल्या असून नगरसेवकांच्या सोबत असलेले गुंड प्रवृत्तीचे बाऊन्सर्स आणि कार्यकर्ते यांना पालिकेत येऊच न देण्याची मागणी आता केली जातेय.

COMMENTS