कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का !

कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का !

कल्याण – कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेला मोठा धक्का बसला असून विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्यावर नाराज शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे देणार असल्याचा इशारा दिला आहे. रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली तरच पक्षाचं काम करू अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. सुभाष भोईर यांनी पाच वर्षात कुठलंही काम केलं नाही, उलट शिवसैनिकांना त्रास दिला असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

तर दुसरीकडे करमाळ्यात राष्ट्रवादीमधून आलेल्या रश्मी बागल यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं शिवसेना आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यकर्त्यांना आज अश्रू अनावर झाले होते. या कार्यकर्त्यांचा माताेश्रीबाहेरच अश्रूंचा बांध फुटला होता. तानाजी सावंत यांच्यामुळंच तिकीट न मिळाल्याची शिवसैनिकांची भावना होती.
त्यामुळे तानाजी सावंतांना शिव्यांची लाखाेळी केली होती.

COMMENTS