कर्नाटकमधील विधानसभा पोटनिवडणूूक निकाल, भाजपचा ‘एवढ्या’ जागांवर विजय!

कर्नाटकमधील विधानसभा पोटनिवडणूूक निकाल, भाजपचा ‘एवढ्या’ जागांवर विजय!

मुंबई – कर्नाटकमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा 6 जागावर विजय झाला आहे. तर 6 जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे या 6 जागाही भाजपच्या ताब्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच काँग्रेसचा एका जागेवर विजय झाला असून आणखी एका जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर एका जागेवर अपक्ष आघाडीवर आहे.

दरम्यान कर्नाटक पोटनिवडणुकीचा निकाल हा देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी संदेश आहे, जर कोणी जनादेशाच्या विरोधात जात असेल आणि लोकांचा विश्वासघात करत असेल, जनतेचा पाठीत खंजीर खुपसत असेल तर संधी मिळताच लोक त्याला उत्तर देतात असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. तसेच कर्नाटकमध्ये आता जोडतोडीचं नाही तर स्थिर आणि मजबूत सरकार असणार आहे. झारखंडच्या लोकांनीही लक्षात ठेवायला हवं की काँग्रेस कधीच आघाडीचा धर्म निभावत नाही. काँग्रेस आपल्या स्वार्थासाठी आघाडी आणि जनमताचा वापर करून घेत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

COMMENTS