कर्नाटक पोटनिवडणूक निकाल, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

कर्नाटक पोटनिवडणूक निकाल, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

बंगळुरु – कर्नाटकमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभेच्या! पोटनिवडणुकीचा निकाल आज लागत आहे. 15  मतदारसंघात ही निवडणूक घेण्यात आली होती. 15 जागांसाठी 165 जण निवडणुकीच्या मैदानात आहेत.गोकाक, अथणी, कागवाड, शिवाजीनगर, यशवंतपूर, विजयनगर, हिरेकेरुर, राणीबेन्नूर, हुनसूर, महालक्ष्मी लेआउट ,के .आर. पूरम, होसकोटे, चिक्कबळळापूर, यल्लापूर या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या 15 पैकी 6 मतदारसंघात भाजपला विजय मिळवणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास कर्नाटकातील येडीयुरप्पांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार कोसळू शकतं. त्यामुळे भाजपला किती जागा मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान 15 पैकी 10 जागांवर भाजप आघाडीवर आहे तर दोन जागी काँग्रेस उमेदवार पुढे आहेत. तसेच जेडीएस आणि अपक्ष 1-1 जागेवर आघाडीवर आहे. 225 जागांच्या कर्नाटक विधानसभेत 223 जागांपैकी 15 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. सध्या भाजपकडे 105,  काँग्रेस 66 जेडीएस 34, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष आमदार आहेत.

COMMENTS