शरद पवारांच्या भेटीबाबत एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य!

शरद पवारांच्या भेटीबाबत एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य!

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खडसे हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी नागपूरमध्ये गेली असल्याची चर्चा कालपासून सुरु आहे. परंतु आपण कोणाचीही भेट घेतली नसल्याचे खडसे म्हणाले. या सर्व अफवा आहेत. विधानभवानात माझी काही कामं असतात, मी मुख्यमंत्र्यांना भेटेल, शरद पवार आले तर त्यांना भेटेल आणि कोणी भेटायचं असेल तर त्यांना देखील भेटेल. मात्र याचा तुम्ही वेगळा अर्थ काढत आहात, कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा होती. ते नागपूर येथे शरद पवार यांनाच भेटण्यासाठी गेले असल्याची चर्चा होती. परंतु आपण शरद पवारांची भेट घेतली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच माझं मन वळवण्याचा प्रश्नचं येत नाही, कारण मी काही कोणता निर्णय घेतलेला नाही. जर निर्णय घेतला असता तर वरिष्ठांना मन वळवण्याचा प्रसंग आला असता. परंतु, माझा वरिष्ठांशी कायम संपर्क असतो. मात्र असा कोणताही विषय नसल्याने वरिष्ठांनी माझं मन वळवण्याचा आजतरी संबंध नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS