माफिया कंत्राटदाराला वाचवण्यासाठी ठाकरे सरकार त्या महिलेची दखल घेत नाही – किरीट सोमय्या

माफिया कंत्राटदाराला वाचवण्यासाठी ठाकरे सरकार त्या महिलेची दखल घेत नाही – किरीट सोमय्या

मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन केलं आहे. घाटकोपर येथील शितल दामा या महिलेच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करत सोमय्या यांनी हे आंदोलन केलं आहे. 3 ऑक्टोबर रोजी शितल दामा ही महिला घाटकोपर येथील नाल्यातून वाहून गेली होती. त्यानंतर तिचा मृतदेह 22 किलोमीटर अंतरावर हाजीहली येथे सापडला. याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असून माझ्या पत्नीचा मृत्यू झाला कसा असा सवाल शितलच्या पतीनं केला आहे. परंतु या घटनेला 15 दिवस झाले असतानाही प्रशासनानं अजून कोणतही उत्तर दिलं नाही. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

COMMENTS