कोफी अन्नान यांचं निधन !

कोफी अन्नान यांचं निधन !

नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे आज निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. गोल्ड कोस्ट म्हणजेच आत्ताचा घाना या देशात त्यांचा ८ एप्रिल १९३८ रोजी जन्म झाला होता. १९९७ मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ रहावा म्हणून संयुक्त राष्ट्र विकास समुहाची स्थापना केली होती. तसेच १९६२ ते १९७४ आणि १९७४ ते २००६ इतका प्रदीर्घ काळ ते संयुक्त राष्ट्रात कार्यरत होते.

दरम्यान कोफी अन्नान यांना २००१ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.  १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या अद्दीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले.कोफी अन्नान यांनी जागतिक स्तरावर शांतता कशी प्रस्थापित होईल यावर लक्ष केंद्रीत केले आणि त्यासाठी आपले आयुष्य वेचले होते. जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

COMMENTS