कोल्हापुरात शिवसेनेला धक्का, 6 पैकी 5 आमदार हरले !

कोल्हापुरात शिवसेनेला धक्का, 6 पैकी 5 आमदार हरले !

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.शिवसेनेचे 6 पैकी 5 आमदार हरले आहेत. राधानगरीतील प्रकाश आबिटकर हे एकमेव आमदार टफ फाईट देत होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार के पी पाटील लढत झाली. यात आबिटकर यांनी बाजी मारली. त्यामुळे शिवसेनेच्या 6 पैकी केवळ एकच आमदारानं आपली जागा वाचवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 10 मतदारसंघ आहेत. यापैकी 2014 मध्ये 6 शिवसेनेकडे, 2 भाजपकडे आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसकडे जागा होत्या. परंतु या निवडणुकीत मात्र शिवसेनेला कोल्हापुरात धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान या निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांचा विजय झाला आहे. जाधव यांनी शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला आहे. तर हातकणंगलेतून काँग्रेसचे राजीव आवळे यांचा विजय झाला असून याठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार सुजीत मिणचेकर यांचा पराभव झाला आहे. तसेच शाहूवाडीत जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे यांचा विजय झाला आहे. तर शिवसेनेचे सत्यजित आबा पाटील पराभूत झाले आहेत.

शिरोळमधून अपक्ष राजेंद्र यड्रावकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी विद्यमान आमदार उल्हास पाटील यांचा पराभव केला आहे. तर करवीरमधून चंद्रदीप नरके या विद्यमान आमदाराचा पराभव झाला आहे. तर करवीरमध्ये काँग्रेसचे पी एन पाटील यांचा विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांचा पराभव केला आहे.


 

COMMENTS