भाजपमध्ये गेलेला राष्ट्रवादीचा माजी नेता म्हणाला ‘घड्याळाचं बटन दाबा’!

भाजपमध्ये गेलेला राष्ट्रवादीचा माजी नेता म्हणाला ‘घड्याळाचं बटन दाबा’!

कोल्हापूर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं. कोण भाजप, शिवसेनेत गेलं तर कोण काँग्रेस-राष्ट्रवादीत गेलं. या जोरदार झालेल्या पक्षांतरामुळे कोण कुठे गेलंय याचा ताळमेळ जनतेला लागत नाही. अशातच आता काही नेत्यांनाही आपण कोणत्या पक्षात आलोय याचं कन्फ्यूजन झालं असल्याचं दिसत आहे. कारण कोल्हापुरातील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या धनंजय महाडिक यांनी भर सभेत कमळाचं बटन दाबा म्हणण्याऐवजी घड्याळाचं बटन दाबा असं म्हटलं आहे. महाडिक प्रचाराच्या निमित्ताने गोकुळगाव शिरगाव येथे बोलत होते.

रम्यान आपला नेता चुकला असला तरी जनता मात्र सावध होती. त्यामुळे महाडिक यांच्या वक्तव्यानंतर सभास्थळी जराशी कुजबुज सुरू झाली. त्यानंतर आपण कुठेतरी चुकलोय हे धनंजय महाडिकांच्या लक्षात आलं. आपली चूक लक्षात आल्यावर लगोलग त्यांनी आपली चूक सुधारली. आणि कमळ सोडून मी चुकून घड्याळ असं बोलून गेलो. मी गेले अनेक दिवस राष्ट्रवादीत होतो. त्यामुळे मी कमळ सोडून घड्याळ बोलून गेलो. मात्र तुम्ही गैरसमज न करता कमळाचंच बटन दाबा असं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS