शिरोळ नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा, राजू शेट्टी- काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीची विजयी सलामी !

शिरोळ नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा, राजू शेट्टी- काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीची विजयी सलामी !

कोल्हापूर – शिरोळ नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आणि राजू शेट्टी यांच्या आघाडीला यश मिळालंय. पहिल्यांदाच राजू शेट्टी आणि दोन्ही काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या शाहु आघाडीचे उमेदवार अमर पाटील हे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. त्यांनी 35 एवढ्या निसटत्या मताधिक्याने विजय मिळवाला आहे. तर एकूण 17 जागांपैकी 9 जागांवर शाहु आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ताराराणी आघाडीसोबत एकत्र येऊन शड्डू ठोकले होते. पूर्ण ताकद लावूनही त्यांच्या हाती फारस यश लागलं नाही. त्यांच्या आघाडीला 7 जागांवर यश मिळालं आहे. तर एका ठिकाणी अपक्षाची सरशी झाली आहे. दुसरीकडे शिवसेनेचा स्थानिक आमदार असतानाही त्यांच्या आघाडीला एकही जागा मिळू शकली नाही. शेट्टी आणि दोन्ही काँग्रेसची आघाडी असल्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडं लागलं होतं. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आघाडी आणि राजू शेट्टी यांना बळ देणारा हा विजय आहे.

COMMENTS