“कुस्ती लीगसाठी शरद पवारांचे आशिर्वाद घेतले, नाहीतर…”

“कुस्ती लीगसाठी शरद पवारांचे आशिर्वाद घेतले, नाहीतर…”

मुंबई – क्रिकेट, कबड्डीनंतर आता कुस्ती लीग सुरू होणार आहे. झी माध्यमसमुहाने यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबतची घोषणा काल झी समुहाचे सर्वेसर्वा सुभाष चंद्रा यांनी केली. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हजेरी लावली होती. यावेळी बोलताना सुभाष चंद्रा यांनी क्रिकेट लिगच्यावेळीची आठवण करुन दिली. त्यावेळी आम्ही जी चूक केली ती आता कबड्डीच्यावेळी केली नाही. कुस्तीलीगसाठी पवारांचे आर्शिवाद घेतले आहेत. त्यांचे आर्शिवाद घेतले नसते तर आयसीएलची गत झाली तशी कुस्तीचीही गत झाली असती अशी आठवण सुभाष चंद्रा यांनी सांगितली. पहिली कुस्ती लीग स्पर्धा 9 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे.

झी समूहाने कुस्तीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र कुस्ती लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला, याचा आनंद आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे त्यांचे अभिनंदन करत असल्याचं शरद पवार म्हणाले. या स्पर्धेमुळे देशभरातून नवे पैलवान पुढे येतील व जगभरात महाराष्ट्रातील कुस्तीला प्रतिष्ठा मिळवून देतील असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. या उपक्रमाच्या माध्यमातून कुस्ती ही आखाड्यातील प्रेक्षकांपुरती मर्यादित न राहता देशभरातील लोक पाहतील. सर्व क्रीडाप्रेमींचे या स्पर्धेला समर्थन मिळेल, असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

https://twitter.com/PawarSpeaks/status/951809699887816704

COMMENTS