कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव लोकसभेत सादर !

कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव लोकसभेत सादर !

नवी दिल्ली – राज्यसभेनंतर आज कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सादर केला. यावेळी काँग्रेसनं सरकारवर जोरजार टीका केली. सभागृहात विरोधकांनी या प्रस्तावाला विरोध करत गदारोळ केला. काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी आणि अमित शाह यांच्यात यावरुन चांगलीच जुंपली असल्याचे पहावयास मिळाले. तसेच हा प्रस्ताव मांडत असताना सरकारने रातोरात नियमांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला आहे.

दरम्यान मोदी सरकारच्या या निर्णयाला काश्मीर खोऱ्यातील नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपीसह स्थानिक पक्षांनी विरोध केला आहे. यामुळे काश्मीरी जनतेच्या विश्वासाला तडा गेला असुन आम्ही याला सर्व मार्गांनी आव्हान देणार असल्याचं पीडीपीचे खासदार नझीर अहमद यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही फक्त पुस्तकं फाडले, पण भाजपने संविधानच फाडून टाकले आहे. आम्ही भारतीय आहोत. या देशाचा भाग आहोत. पंजाबसह ईशान्येकडील राज्यातही असे कळीचे प्रश्न निर्माण झाले होते. तिथे असे झाले नाही. मग काश्मीरसोबतच असे का केले, असा प्रश्नही अहमद यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS