प्रियंका गांधी यांना लोकसभेची उमेदवारी न देण्याचं खरं कारण !

प्रियंका गांधी यांना लोकसभेची उमेदवारी न देण्याचं खरं कारण !

नवी दिल्ली – काँग्रेसकडून वाराणसी मतदारसंघातून
प्रियंका गांधी यांच्याऐवजी अजय राय यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी प्रियंका गांधी यांनी
अनेकवेळा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. परंतु ऐनवेळी वाराणासीतून अजय राय यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आधी उत्तर प्रदेशात सत्ता आणायची आणि त्यानंतर प्रियंका यांना २०२४ च्या लोकसभेच्या रणसंग्रामात उतरवायचे, अशी रणनीती काँग्रेसने आखली आहे. त्यामुळेच प्रियंका यांना वाराणासीतून लढण्यास मनाई करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीसोबतच उत्तर प्रदेशातील २०२२ च्या विधानसभा निवडणुकांची तयारी काँग्रेसनं सुरु केली आहे. प्रियंका यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर ‘त्या ‘मिशन २०१९’साठी नव्हे तर ‘मिशन २०२२’ साठी आल्या आहेत,’ असं वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं होतं. उत्तर प्रदेशात काँग्रेसचं सरकार बनविण्याचं मिशन प्रियंकांकडे सोपवण्यात आल्याचंही राहुल यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे प्रियंका यांना लोकसभेची उमेदवारी दिली नसल्याची माहिती आहे.

COMMENTS