लोकसभेतील युतीसाठी भाजपचा नवा प्रस्ताव, शिवसेनेला ‘या’ दोन जागा सोडणार ?

लोकसभेतील युतीसाठी भाजपचा नवा प्रस्ताव, शिवसेनेला ‘या’ दोन जागा सोडणार ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी भाजपनं शिवसेनेला नवा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने शिवसेनेला लोकसभेत 2 जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचा 24-24 जागांचा म्हणजेच 50 – 50 चा फॉर्म्युला ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत शिवसेनेकडून उत्तर आलं नसून या दोन्ही पक्षामध्ये युती होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान या निवडणुकीत पालघरची जागा सोडण्याचा शिवसेनेचा आग्रह आहे. तर हातकणंगलेची जागा शिवसेनेला मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. रावेर आणि बारामती जागांवर अद्याप विचार सुरु असून आणखी एक-दोन जागांची आदलाबदली करण्यावर विचार केला जात असल्याची माहिती आहे.यावरुन युतीसाठी भाजपकडुन अजूनही प्रयत्न सुरु असून शिवसेनेनं मात्र अजून कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे युती होणार की नाही हे अद्याप तरी सांगण कठीण आहे.

COMMENTS