मराठवाड्यासाठी खूशखबर, मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात मोठा करार !

मराठवाड्यासाठी खूशखबर, मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात मोठा करार !

लातूर – सोमवारी झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमात मोठा करार झाला आहे. या करारामुळे मराठवाड्यातील बेरोजगांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारचा एमआयडीसी विभाग आणि रेल्वे मंत्रालय यांच्यात हा करार झाला असून लातूरमध्ये रेल्वेचे डबे बनवण्यात येणार आहेत. यासाठी लातूर एमआयडीसीत जागा उपलब्ध करून देण्यात आली असून लातूरमध्येच रेल्वे रेल्वेचे डबे बांधण्यात येणार आहेत. राज्य सरकार आणि एमआयडीसीमध्ये 600 कोटींचा हा करार झाला आहे.

दरम्यान भारतात विविध ठिकाणी मेट्रोचे प्रकल्प सुरू असून त्यासाठी मेट्रो डब्यांची मागणी वाढली आहे. यापैकी अर्धी मागणी ही एकट्या महाराष्ट्रातून आहे. म्हणूनच रेल्वे या लातूरमध्ये मेट्रोचे डबे बनवणार असून ही फक्त राज्याची गरजच नाही तर देशाची आणि जगाची मेट्रो डब्यांची गरज लातूर भविष्यात भागवणार असल्याचं केंद्रीयमंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे.

15 हजार लोकांना मिळणार रोजगार

तसेच लातूरमधील मेट्रो डब्बे बनवण्याचा हा प्रकल्प मराठवाड्याचे भवितव्य बदलवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातील हा प्रकल्प सर्वात महत्त्वाचा ठरणार असून हा प्रकल्प थेट 15,000 रोजगार निर्माण करू शकणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

COMMENTS