राज्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव नाही –महादेव जानकर

राज्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव नाही –महादेव जानकर

मुंबई – कर्नाटकमध्ये बर्ड फ्ल्यू या रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. परंतु राज्यातील नागरिकांनी घाबरण्याचं कारण नसून राज्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव नसल्याचं वक्तव्य पशू संवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. तसेच जनतेनं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

 

दरम्यान महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा अजिबात प्रादुर्भाव नसून कोणतेही लक्षणं दिसून आले नसल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे. तसेच पशु संवर्धनाचे अधिकारी, उपायुक्त अधिकारी, सीमेवर लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रात 8 ठिकाणी लॅब आहेत. पुण्यातल्या लॅबमध्ये अनेक सॅम्पल टेस्ट केले आहेत मात्र त्यामध्ये कोणतेही बर्ड फ्लूचे विषाणू आढळून आले नसल्याचं ते म्हणाले आहेत.

COMMENTS