विधानसभा, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मराठा समाजाच्या पक्षाची मोठी घोषणा !

विधानसभा, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मराठा समाजाच्या पक्षाची मोठी घोषणा !

मुंबई – आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मराठा समाजानं काही दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या महाराष्ट्र क्रांती सेना पक्षानं मोठी घोषण केली आहे. विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुका लढवणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सुरेस पाटील यांनी केली आहे. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. पक्षाकडून आगामी निवडणुकीत राज्यातील लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा लढवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मराठा क्रांती मोर्चातून निर्माण झालेल्या ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या पक्षाला मराठा समाजाचाच विरोध आहे. मागण्या मान्य करून घेण्यासाठी समाज सक्षम असून यासाठी कोणत्याही राजकीय पक्ष्याच्या स्थापनेची गरज नसल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चातील कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

तसेच राजकीय पक्ष स्थापन करणारे सरकारचे हस्तक असून त्यांची राजकीय उठबस व पार्श्वभूमी विचारात घ्यावी लागणार असल्याचंही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जेष्ठ पदाधिकारी बापूसाहेब शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पक्ष स्थापन होताच समाजातून या पक्षाला विरोध केला जात असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS