श्रीलंकेत राजकीय वादळ, महिंदा राजपक्षेंचा पंतप्रधानपदाचा राजीनामा !

श्रीलंकेत राजकीय वादळ, महिंदा राजपक्षेंचा पंतप्रधानपदाचा राजीनामा !

कोलंबो – श्रीलंकेत सध्या राजकीय वादळ आलं असून विद्यमान पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज  राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विक्रमसिंगे हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी उद्या होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रपती मैत्रिपाल सिरीसेना यांनी आपल्या विशेष अधिकारांचा वापर करत 26 ऑक्टोबर रोजी तत्कालीन पंतप्रधान विक्रमसिंगे यांना पदावरून दूर केले होते. त्यानंतर महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाची लगेच शपथ घेतली. मात्र, विक्रमसिंगेंच्या समर्थकांनी या घटनेचा विरोध केला होता.

दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून याठिकाणी राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर आता पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.श्रीलंकेतील संसदेत विक्रमसिंगे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. संसदेत विक्रमसिंगेंनाच बहुमत मिळेल हे माहीत असल्यामुळे मैत्रिपाल सिरिसेना यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत संसदच बरखास्त केली होती.

 

COMMENTS