माझा राजीनामा स्वीकारा, मनोहर जोशींची उद्धव ठाकरेंना विनंती !

माझा राजीनामा स्वीकारा, मनोहर जोशींची उद्धव ठाकरेंना विनंती !

मुंबई – शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी हे आज 82 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी लिहिलेल्या ‘प्रशासन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज सायंकाळी दादर, शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. 52 वर्षांचा राजकीय आणि सामाजिक अनुभव तसंच या काळात नगरसेवक, महापौर, मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष अशी विविध पद भूषवताना नोंदवलेल्या निरिक्षणांचा मनोहर जोशी यांनी या पुस्तकात समावेश केला आहे.

यावेळी बोलत असताना मला निवृत्त करा, माझा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती मनोहर जोशी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कली आहे. एका ठराविक वयानंतर आपण माणूस म्हणून शारीरिक रित्या कोसळतो. आपल्या मागे असलेल्या लोकांना रोखून धरणे योग्य नाही. निवृत्त होण्याची संधी द्या अशी विनंती मनोहर जोशी यांनी केली आहे.उद्धव जी अयोध्येला जाऊन आले यामुळे संपूर्ण देशात कौतुक सुरू आहे. मी त्यांचा आभारी आहे.

महापौरांनी माझ्या आधी भाषण केले पण त्यांना माहीत नाही मी पण एकेकाळी महापौर होतो.मुलाखती देणाऱ्यांनी या कार्यक्रमाला येऊन शान वाढवली.प्रशासन चांगल्या प्रकारचे असेल तर देशही सुधारतो. मी तीन मोठी पदे उपभोगली, ती हुशारी बाळासाहेबांची होती. प्रशासनातील दिरंगाई ही देशाचे नुकसान करते. समाज सुधारणेचा भाग हे पुस्तक आहे. प्रशासनाच्या कार्यालयातून येणारा माणूस हसत हसत आले पाहिजे.

हल्ली लोक शिव्या घालत येतात, कामे ही ताबडतोब झाली पाहिजेत असं मतही यावेळी मनोहर जोशी यांनी व्यक्त केलं आहे.मी आज तृप्त आहे मला शिवसेनेमुळे सगळं मिळालं पण मराठी एकजूट नाही आहे. ती एकजूट मला हवी आहे. आणि ती एकजूट उद्धवजी करतील ही मला खात्री आहे.मला कधीच फ्रस्टेशन आलं नाही. बाळासाहेबांमुळे सगळं मिळाले. निवृत्तीचे वय ठरले पाहिजे.

मला उद्धवजींनी निवृत्त होऊ दिलं नाही. मात्र आता माझा उद्धवजींनी राजीनामा स्विकारावा.

मला निवृत्त होण्याची संधी द्या मला सगळं मिळाले. शरीर साथ देत नाही आता अशी विनंती यावेळी मनोहर जोशी यांनी केली आहे.

परंतु यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला आहे. सरांसारखी व्यक्ती (मनोहर जोशी) निवृत्त होऊ शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मी उण्मेशला विचारायला गेलो की सर निवृत्त होऊ शकतात का कारण यामध्ये वृत्ती असते .तुमच्यासारखी व्यक्ती निवृत्त होत नसते. मी आता राजीनामा स्वीकारेल पण उद्या तुम्ही ‘मातोश्री’वर याल आणि काम द्या बोलाल. तुमच्यासारखे सहकारी शिवसेना प्रमुखांना लाभले त्याच बांधणीने शिवसेना पुढे जातेय.तुमचा आशिर्वाद आणि प्रेम मला मिळाले आणि पुढेही ते मिळो. नितीनजी कार्यक्रमला आले नाहीत मात्र ते म्हणाले होते आमचं सरकार येणार नाही काय खात्री असते.आम्ही म्हणतो आमचं सरकार येणार, भगवा फडकणार.मात्र मोठ मोठ्या घोषणा करून सरकार आले. निगेटिव्ह माईंडने यश मिळालेली ही पहिली माणसं बघितली असल्याची टीकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

राम मंदीरावरून माझ्यावर टीका का केली ?

मी तिकडे जाऊन काम करणारच मंदीर बांधणारच, मी अयोध्येला जाताना अनेकांच्या मनात धाकधूक झाली. कशाला धाकधूक झाली पाहीजेत ? मी काय पाकिस्तानात गेलोय का ? मी कराचीत राम मंदीर बाधांयलो गेलो का ?शेवटी शिर्डीचे मंदीर धाऊन आले मदतीला राज्याला ५०० कोटी कर्ज दिले असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राजकरणातले लोक प्रशासनात जाऊ शकत नाहीत मात्र प्रशासनातील व्यक्ती निवृत्ती नंतर राजकरणात येऊ शकतात. मुंढे जे काम करतात ते चांगलेच. तुम्ही राजीनामा द्यायच्या भानगडीत पडू नका तुम्ही पुस्तके लिहा. आयुष्यात पुढे कसे जावे यासाठी हे पुस्तक असल्याचंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS