मराठा आंदोलनाला हिंसक म्हणा-यांनो, मराठा आंदोलकांची “ही” चांगली बाजूही बघा !

मराठा आंदोलनाला हिंसक म्हणा-यांनो, मराठा आंदोलकांची “ही” चांगली बाजूही बघा !

मुंबई –  राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन तीव्र झाले आहे. राज्यभरात काल उत्सुफुर्तपणे बंद पाळण्यात आला. या आंदोलनात काही ठिकाणी जाळपोळ झाली. काही ठिकाणी बसची तोडफोड झाली. हे खरं आहे. मात्र हे जाळपोळ आणि तोडफोड करणारे घटक नेमके कोण आहेत ते तपासल्यानंतरच त्याबाबत सत्यता समोर येईल. मात्र केवळ साप साप म्हणून भुई धोपटून चालणार नाही. सरसकट आंदोलनाला बदलमा करणं योग्य होणार नाही. जगानं दखल घ्यावी असे अभूतपूर्व 58 मोर्चे मराठा समाजानं काढले. त्यात कुठेही हिंसा नव्हती. अत्यंत शिष्टबद्ध पद्धतीनं मोर्चे निखाले. मात्र आता काही छोट्यामोठ्या गोष्टीवरुन आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंसेच कुणीही समर्थन करणार नाही. भावनेच्या भरात काही गोष्टी घडत असतील तर त्यालाही आवर घालायलाच हवा. पण आंदोलकांची ही चांगली बाजूनही समोर यायलाच हवी. कालच्या आंदोलनातला हा व्हिडिओ नक्की बघा…

ज्या आंदोलकांनी रस्त्यार टायर जाळले. त्या रस्त्यावरुन एक अँब्युलन्स येत आहे हे पाहून जळते टायर दूर केले त्यावर पाणी मारले आणि तिथून अँब्युलन्सला वाट करुन दिली. तर दुसरीकडे नागपूर –बोरी – तुळजापूर या रस्त्यावर आंदोलन करणा-या आंदोलकांनी तिथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची जेवणासाठी चक्क पंगत बसवली. जे आंदोलनक अँब्युलन्सला वाट करुन देतात. जे आंदोलक पोलिसांना जेवायला घालतात. ते आंदोलक हिंसक कसे असतील ?

COMMENTS