मराठा आंदोलकांच्या रोषाचा विनायक मेटेंना फटका, आंदोलन ठिकाणाहून हुसकावून लावलं, पहा व्हिडिओ !

मराठा आंदोलकांच्या रोषाचा विनायक मेटेंना फटका, आंदोलन ठिकाणाहून हुसकावून लावलं, पहा व्हिडिओ !

परळी – राज्यभरात मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची ठिणगी परळीमध्ये पडली होती. गेल्या चार दिवसांपासून परळीमध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. चौथ्या दिवशी शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे आंदोलकांची भेट घेण्यासाठी पोहचले. मात्र तिथे आंदोलकांच्या रोषाचा सामना मेटे यांना करावा लागला. आंदेलकांपुढे बोलायला थांबले असता त्यांच्या हातातून माईक हिसकावून घेण्यात आला. तसंच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेवटी त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. काही जणांनी कडं करुन त्यांना तिथून बाहेर काढलं आणि सुरक्षित गाडीत बसवलं.

राज्यभरात 55 विराट मूक मोर्चे काढल्यानंतरही आरक्षणाबाबत अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे सरकारविरोधात मराठा समाजाचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे. आता ठोक मोर्चा काढण्याचा इशारा मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे. तसंच पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांना आषाढी वारीनिमित्त होणा-या पूजेसाठी येऊ देणार नाही असा इशारा देण्यात आलाय. आगामी काळात आरक्षणाबाबत निर्णय तातडीने न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

COMMENTS